श्री जानाईदेवी यात्रे निमित्त शेटफळगढे येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान उत्साहात साजरी

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण

भिगवण : (ता.११) ‌शेटफळगढे येथे बुधवार दि. ०५/११/२५ व०६/११/ २५ रोजी श्री जानाईदेवी यात्रा उत्सव उत्सहात पार पडला, यात्रेनिमित्त गावांमध्ये नेहमी प्रमाणे गुरुवार दि.०६/११/२५ रोजी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने जंगी कुस्ती मैदान आयोजित केले होते त्यामध्ये गावातील पैलवानां बरोबर पंचकोशीतील पैलवान व संपूर्ण महाराष्ट्र तसेच पंजाब, हरियाणा राज्यांमधुन नामांकित पैलवानांनी उपस्थिती लावली होती .

यामध्ये प्रथम क्रमांक कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. दादा शेळके विरुद्ध पै निशांत हरियाणा यांच्यामध्ये रुपये दोन लाख इनाम ठेवण्यात आला होता ही कुस्तीन बरोबरीत सोडवली, तसेच क्रमांक दोनची कुस्ती पै. सुदर्शन कोतकर विरुद्ध पै. संदिप मोटे यांची झाली, यामध्ये सुदर्शन विजयी झाला. तसेच तृतीय क्रमांक कुस्ती पै. मनिष रायते विरुद्ध पै. संग्राम पाटील यामध्ये रायते पैलवान विजयी झाले नंबर चार आंतरराष्ट्रीय पैलवान सुरज कोकाटे विरुद्ध संदीप पाटील यांच्यामध्ये झाली त्यामध्ये नामदेव विजय झाले याचबरोबर अनेक प्रेक्षणीय कुस्त्या मैदानात पार पडल्या गावातील ग्रामस्थांनी या कुस्त्यांवर लाखोंचा बक्षिस म्हणून वर्षाव केला मैदान यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी अनेक कुस्ती शौकिन व ग्रामस्थांनी लाखो रुपये पुरस्कृत करून पैलवानांना प्रोत्साहान दिले व ग्रामस्थ तसेच गावातील आजी माजी पैलवान यांनी उत्कृष्ठ नियोजन करण्यासाठी जानाई यात्रा कमिटीने खूप परिश्रम घेतले व मैदान यशस्वी केले.

कमिटीच्या वतीने श्री दत्तात्रय (अण्णा) शिरसाट, श्री रखमाजी सवाने (पोलीस पाटील) श्री अनिल तात्या वाबळे, गायकवाड रावसाहेब, श्री बापूराव वाबळे, श्री मछिंद्र तात्या शेलार, मानसिंग काका वाबळे, संतोष काका वाबळे, श्री भानुदास आबा कदम, श्री ज्ञानदेव माऊली भोसले, शरद अण्णा झगडे, श्री वसंत तात्या राजपुरे, स्वप्निल भैया झगडे, संदीप बापू मचाले लोकवर्गणी गोळा करण्याचे काम या सर्वांनी मिळून केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button