रिपब्लिकन बहुजन परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा देविकाताई चव्हाण यांना जागतिक स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान.

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:शंकर जोग,पुणे

पुणे : रिपब्लिकन बहुजन परिषद महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा देविकाताई चव्हाण यांना स्वराज्य शासन व साजीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्ती पुरस्कार पुणे मनपा नगरसेविका पल्लवीताई जावळे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे विशाल लोंढे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी पांडुरंग शेलार माजी कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, उज्वलाताई भोसले अध्यक्षा स्वराज शासन संस्था, सुखदेव तात्या सोनवणे दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, रिपब्लिकन बहुजन परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष संदीप भंडारी, मयूर घारे आदि यावेळी उपस्थित होते. देविकाताई चव्हाण हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असून रिपब्लिकन बहुजन परिषदेच्या माध्यमातून गोरगरिबांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आंदोलनाच्या व मोर्च्याच्या माध्यमातून आवाज उचलून त्यांना न्याय देण्याचे काम केले. त्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button