
लोकशासन : प्रतिनिधी-गणेश गुप्ते,भवानीनगर
भवानीनगर : (ता.०२) इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांना आज दि.(२) रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद गजानन पाटील यांनी भेटी दिल्या.यामध्ये सणसर भागातील अशोकनगर येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मॉडेल स्कूल चे काम तात्काळ सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या तसेच शाळेचा परिसर, स्वच्छता याबाबत सूचना दिल्या व सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली.
यानंतर लासुरण्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणचा आढावा घेतला. जळगाव मध्ये सांडपाणी घनकचरा प्लास्टिक प्रक्रिया केंद्र, मॉडेल स्कूल माळी वस्ती, ग्रामपंचायत कार्यालय स्मशानभूमी घनकचरा प्रकल्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेल ओढा या ठिकाणी भेट दिली.
कडबनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी भेट देण्यात आले अंगणवाडी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय नाविन्यपूर्ण उपक्रम भेट ऑक्सिजन पार्क व कुरण सफारी या ठिकाणी भेट दिली.
निमगाव येथील मॉडेल स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसले वस्ती निरवांगी येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट दिली. भोडणी, पिंपरी खुर्द, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच नवीन बांधकाम या ठिकाणी भेट दिली.
इंदापूर तालुक्यामधील मार्च महिन्याच्या आज सुरू असलेल्या कामाचे काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन खुडे,सणसर ग्रामसेवक सचिन पवार, सणसर सदस्य रणजित निंबाळकर , सरपंच यशवंत नरूटे,सागर भोईटे, दत्ता चव्हाण, पार्थ निंबाळकर, मोहिनी गायकवाड, सुनंदा गायकवाड, आधी शिक्षक उपस्थित होते.
Hey everyone! Just tried 13win23com and it’s pretty alright. Quick deposits, some fun games. Nothing crazy, but a good place to spend some time. Check it out here 13win23com!