रेशनचा लाखोंचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक पकडला : वालचंदनगर पोलिसां कडून माजी सरपंचासह एकावर अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-पुणे ग्रामीण

वालचंदनगर : शासकीय गोदामातील रेशनचा गहू परस्पर काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना वालचंदनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत ५०० गोण्या रेशनचा गहू आणि १२ टायर ट्रक असा एकूण २१ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार काशिनाथ साहेबराव नागराळे यांनी तक्रार दाखल केली असून विलास नारायण गावडे, वय ५३ वर्षे, धंदा चालक, रा. डाळज नं. २, (ता. इंदापूर, जि. पुणे) व माजी सरपंच सतीश सुखदेव हगारे, रा. हगारेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी विलास नारायण गावडे व सतीश सुखदेव हगारे यांनी संगनमत करून, आरोपी सतीश हगारे च्या मालकीचा १२ टायर ट्रक (एम एच ४२ बी एफ ३५२२) मध्ये सोलापूर येथील शासकीय गोदामातून भरलेला ६,२५,००० रुपयांचा रेशनचा गहू, मोहोळ येथील शासकीय गोदामात खाली करायचा होता, तो तेथे न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचा दिशाभूल करून अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये परस्पर घेऊन जात असताना बोरी चौक, लासुर्णे येथे आरोपी विलास गावडे याला मुद्देमाल व ट्रकसह पकडण्यात आले.या कारवाई मध्ये वालचंदनगर पोलीसांकडून एकुण २१,२५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन यामध्ये ६,२५,०००/- रुपये किमतीचा एकूण ५०० गोण्या गहू व १५,००,०००/- रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा १२ टायर ट्रक, आर.टी.ओ. नंबर एम एच ४२ बी एफ ३५२२ जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक घोरपडे हे करीत आहेत तर प्रभारी अधिकारी म्हणून गोपाळ पवार हे काम पाहत आहेत.

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क:8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button