बारामती मध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी करुन सोने ,चांदी सह रोख रक्कम केली लंपास

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-बारामती ग्रामीण

बारामती : बारामती शहरातील तांदुळवाडी भागातील बंद घर रात्रीच्यावेळी घरफोडी करुन सोने , चांदी सह रोख रक्कम अशी मिळुन पावणे चार लाख रुपयांचा ऐवज लुटला. दवाखान्यातील उपचारासाठी हे कुटुंब थांबले असताना दुसरीकडे या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की बारामती शहरालगत तांदुळवाडी दादापाटील नगर भागात अंबादास दहिदुले हे कुटुंबासोबत राहतात.त्यांच्या कुंटुबातील सर्व बारामती येथील रुग्न दवाखान्यामध्ये दाखल असल्याने मुक्कामी होते.घरी कोणी नसल्याची संधी चोरट्यांनी साधुन मंगळवार दि. १३ रोजीच्या मध्यरात्री घर फोडले. चोरट्यांनी मुख्य लोखंडी दरवाज्याचे तर आतील दरवाजाचे टिकावाच्या सहाय्याने कुलुप तोडुन आत प्रवेश केला.घरातील बेडरुम मध्ये चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने उचका पाचक केली. त्यानंतर चोरट्याने स्वयंपाक घरात मोर्चा वळवत या ठिकाणी पिशव्या , डबे शोधले शोधत असताना एका स्टीलच्या डब्ब्यात सोन्याचा एक तोळ्याचा गंठण , दुसरा सोन्याचा गंठण अर्धा तोळा ,२ सोन्याची कर्ण फुले १ तोळयाची तर चांदीची जोडवे आणि रोख रक्कम असे सुमारे पावणे चार लाख रुपयांची चोरी झाली. हि चोरी मंगळवार दि.१३ रोजीच्या मध्यरात्री सुमारास झाली असावी. दरम्यान चोरट्यांनी काही साड्या , वडिलांचे कपडे देखील चोरीला गेल्याचे या बातमीदार संतोष दहिदुले यांनी सांगीतले.

बारामती तालुक्यात गेल्या महिनाभरात घरफोड्यांच्या घटनांत वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. ‘रात्रीबेरात्री आणि दिवसा देखील चोरी होत असल्याने आम्ही सुरक्षित नाही”, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.’

सध्या बारामती व ग्रामीण भागामध्ये गस्तीच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असुन याचबरोबर दादा पाटील नगर परिसरात मुख्य लक्ष ठेवले जाणारा आहे. बारामतीची मोठी लोकसंख्या असुन गस्तीसाठी योग्य नियोजन करणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button