वैष्णवी माने ची जिल्हास्तरीय बाॅक्सींग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडलला गवसणी !

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-बारामती

बारामती : गोतंडी (ता.इंदापूर) गावची कन्या वैष्णवी माने हिने जिल्हास्तरीय बाॅक्सींग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले आहे.विद्या प्रतिष्ठान विद्यालयात नववी इयत्तेत शिकत असलेल्या वैष्णवी महेश माने हिने जिल्हास्तरीय बाॅक्सींग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावत आपल्या गावाच्या व शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असुन जिल्हास्तरीय बाॅक्सींग स्पर्धेतील यशानंतर तिची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय बाॅक्सींग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्या बद्दल तसेच राज्यस्तरीय बाॅक्सींग स्पर्धेसाठी तीला शाळा व परीसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षांव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button