इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांनी अधिकृतरित्या पदभार स्विकारला.

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी आज स्वीकारला. इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी नूतन नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादीची निवडून आलेले नगरसेवक यांचं हे सत्कार समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इंदापूर शहरांमधील मधुकर भरणे, सचिन सपकळ, मुकुंदशेठ शहा, सचिन सावंत, प्रमोद राऊत, अक्षर ऑफसेटचे सर्वेसर्वा बंडू चव्हाण, पोपट पवार, पोपट शिंदे, अरविंद वाघ, गजानन गवळी, अशोक इजगुडे , दिलीप वाघमारे,रघुनाथ राऊत ,भारत शिंदे ,शकील सय्यद ,शुभम पवार ,गौरव राऊत ,अमर नलवडे ,पंकज सूर्यवंशी ,स्वप्निल राऊत ,प्रशांत उंबरे , आण्णा ढावरे,अक्षय सूर्यवंशी ,हर्षद सय्यद ,सुनील तळेकर , माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत भरत शहा यांनी जनतेतून नगराध्यक्ष म्हणून विजय मिळवला असून त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.मागील कार्यकाळात तत्कालीन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी इंदापूर शहराच्या विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला. पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी केलेली विकासकामे नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरली. त्याच विकासाच्या भक्कम पायावर आणि जनतेच्या सतत मदतीला धावून जाणाऱ्या नेतृत्वाच्या जोरावर भरतशेठ शहा यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगरसेवक यांच्या जोडीने इंदापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा दावा भरत शेठ शहा यांनी केला. त्याचप्रमाणे इंदापूर शहर हे सर्व सुख सोयी ने एक नंबर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

2 thoughts on “इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांनी अधिकृतरित्या पदभार स्विकारला.

  1. Your style is really unique compared to other folks I
    have read stuff from. Thank you for posting when you’ve got the opportunity, Guess I’ll just book mark
    this site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button