
लोकशासन- प्रतिनिधी : पुणे क्राईम
शेळगांव (ता. इंदापुर) येथील मनिषा मल्हारी खोमणे, वय ३५ वर्षे, रा. शेळगांव, ता. इंदापुर हिची ही सकाळी अंघोळीसाठी चुलीवरती पाणी गरम करत असताना पती मल्हारी रोहिदास खोमणे याने पत्नी मनिषा खोमणे वर चारित्र्यावर संशय घेवुन तीच्या सोबत वाद घालुन चुलीमध्ये जळणाऱ्या लाकडी दांडक्याने पत्नी मनिषा खोमणे हिच्या डाव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर तसेच डोक्यामध्ये चार ते पाच वेळा जोरात मारुन तिला रक्तबंबाळ करुन तिचा खुन केला.
त्यानंतर मल्हारी खोमणे याने स्वतःचा ठावठिकाणा कोणाला समजु नये म्हणून स्वतःचा मोबाईल हा घरामध्ये ठेवुन त्याच्या कडील चार चाकी गाडीने पळून गेला होता.त्यावेळी सदरील महिला मनिषा मल्हारी खोमणे यांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय, इंदापुर येथे नेले आले असता त्यांचा उपचारापुर्वी मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सदरील घडलेल्या घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवुन घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती मयताच्या नातेवाईकांकडुन व जमलेल्या लोकांकडुन घेतली.सदर घटनेच्या अनुषंगाने मयत महिलेची आई बबई भिमराव मदने, वय ६० वर्षे, रा. शेळगांव, ता. इंदापुर, जि.पणे यांच्याकडे घटनेची सविस्तर चौकशी करून फिर्याद घेवुन गुन्हा रजि. नंबर ४१७/२०२५ बी.एन.एस १०३ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील घटनेची माहिती पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी , बारामती उपविभाग व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शन व सुचने प्रमाणे पत्नीस मारहाण करणारा आरोपी याचा शोध घेण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथक व पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळी तीन पथके तयार करुन रवाना केली.गोपनीय माहितीच्या आधारे सदरील आरोपी हा जेजुरी येथे असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होताच सदर आरोपीच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत असताना सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागताच तो त्याच्याकडील चार चाकी वाहनामध्ये बसुन वेगाने पळुन जावु लागला. त्यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी त्याचा शिताफीने वाहनामधुन पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन दिनांक २३/१२/२०२५ रोजी सायंकाळी ०७:४५ वाजता अटक करण्यात आली असून आरोपीस दिनांक २९/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास हा राजकुमारडुणगे, सहा. पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे करत आहेत.
सदरची कामगिरी संदीपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग,डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग,अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, विजय टेळकीकर पोलीस उप-निरीक्षक, मिलींद मिठापल्ली, ग्रेड पोलीस उप-निरीक्षक रतिलाल चौधर तसेच गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्र्य चांदणे, जगदीश चौधर, दादासाहेब डोईफोडे, विकास निर्मळ, महेश पवार, अजित थोरात, गणेश काटकर, किर्तीलाल गायकवाड, रविंद्र पाटमास, विक्रमसिंह जाधव, राहुल माने, गणेश वानकर, ज्योती डिसले यांनी पार पाडली आहे.