
लोकशासन – इंदापूर ग्रामीण
इंदापुर – रूई (ता.इंदापुर) येथे मंगळवार दि.१५ रोजी सायंकाळी गट रचनेवरून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचायत समिती जिल्हा परिषद गट रचनेत रूई ता.इंदापुर गावाला एकाकी टाकून राजकीय महत्व कमी केल्याबद्दल त्या प्रशासनाच्या निर्णयाच्या प्रतीचे दहन करून रूई बाबीरनगरी ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवला.हे षडयंत्र रूई गावच्या बाबतीत प्रशासनाच्या विरोधात हा नागरिकांचा रोष आहे.
पळसदेव बिजवडी गटात रूई गाव होते, त्या अगोदर कळस वालचंदनगर गटात होते, आता निमगाव केतकी जिल्हा परिषद गटात समावेश केला आहे, त्या गटात गावांचा कोणताही संबंध नाही, गावाचं प्राथमिक आरोग्य केंद्र कळस आहे, अर्थकारण बँक ऑफ महाराष्ट्र कळस,पीडीसी लोणी देवकर, आयडी बी आय पळसदेव असा संपर्क आहे, त्यामुळे प्रशासनाच्या जुलमी निर्णयाविरोधात या हिटलरशाही विरोधात सर्व ग्रामस्थ मिळून लढा देऊ असे आकाश कांबळे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शी संपर्क करून न्याय हक्कासाठी लढू, न्याय मिळवल्याशिवाय शांत बसायचे नाही असे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
यावेळी भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाशजी कांबळे, भाजपा ओबीसी सेलचे सचिव आबासाहेब थोरात,जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पांढरमिसे, यांनी मनोगत व्यक्त केली, यावेळी सरपंच अमरसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, बापू लावंड, प्रविणकुमार शहा, वैभव लावंड, स्वप्नील लावंड, दिलीप साळुंखे, अण्णा लावंड, सचिन लावंड, माऊली लावंड, राजू कोकरे, राजू पाळेकर, भैय्या साळुंखे, विशाल कांबळे, सोनू कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते या निषेध सभेचे आभार अविनाश मोहिते यांनी मानले.