
लोकशासन- उपसंपादक : गणेश गुप्ते
इंदापूर : अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती साखर कारखाना भवानीनगर येथील मैदानावर विविध क्षेत्रातील महिलांसह मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांचे (त्रिशताब्दी वर्ष) ३०० वी जयंती उत्सव चे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले होते. गेली ११ वर्ष या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या थाटामाटात व उत्साहात जयंती उत्सव साजरा होत आला आहे.
सर्व महापुरुषांचे स्मारक अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार त्यानंतर मनोगते व्यक्त केली. प्रस्ताविक करताना कल्याणी वाघमोडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून असे जयंती उत्सव साजरी करणे गरजेचे आहे. हा सामाजिक कार्याचा वसा आणि विचार अखंडपणे चालू राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
प्रस्ताविक आयोजक कल्याणी वाघमोडे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त उपस्थित मान्यवर व सर्व बंधू भगिनी यांचे स्वागत व आभार मानले. सर्व महापुरुषांचे इतिहास फक्त वाचून बाजूला ठेवण्यासाठी नाही तर त्यांचे विचार आत्मसात करून अंगीभूत बाळगण्यासाठी असावे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपणही या जीवनात समाजाचे काही देणे लागतो हे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. असे मत व्यक्त केले.

विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता व मार्गदर्शक म्हणून अहिल्यामातेचा कार्य गौरव सर्वां पुढे मांडला. तसेच कवी मोरोपंतांची बारामतीची महती या निमित्ताने देखील बोलून दाखवली. साधी राणी, उच्च विचारसरणी अशा अहिल्या मातेचे कार्य व महती सांगताना ते म्हणाले, अठराव्या शतकातील जगातील उत्तम प्रशासक या अहिल्याबाई होळकर होत्या. त्रिखंडामध्ये एकमेव पुण्यश्लोक ही महान पदवी फक्त अहिल्यादेवी होळकर यांना आहे. १८ व्या शतकात कार्य करत असताना अनेक संघर्ष अहिल्यादेवींना करावा लागला, आपण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करत आहात एक दिवस आपल्या संघर्षाचा इतिहास लोक पुस्तकं लिहितील अशी कौतुकाची थाप प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांना दिली.२८ वर्ष राज्यकर्ते म्हणून त्यांची नोंद आहे. त्यांच्या विशाल कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेत असेच कार्य केले पाहिजे, असा विश्वास व्यक्त केला. सर्व सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहिल्यारत्न पुरस्काराने कला, नाट्य, साहित्य साठी प्रेरणादायी कार्य करणारे ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर
यांना गौरवण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त मनोगत व्यक्त करताना सर्वांना शुभेच्छा देत अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला थोडक्यात उजाळा दिला.या उत्सवाचे आयोजक कल्याणी वाघमोडे यांच्या सामाजिक व संघटन कार्याचे कौतुक केले.सर्व महापुरुषांच्या जयंती व्यापक स्वरुपात साजऱ्या केल्या जाव्यात, अशी भावना व्यक्त केली.
तसेच विधीज्ञ ॲड सुप्रिया बर्गे यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा देत महिलांना पुढे येऊन कार्य केले पाहिजे, महिला कुठेही कमी नाहीत असा संदेश दिला.
युपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या योगेश बोरकर, पुष्कर घोळवे, महसूल सहायक निर्मला घुले, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, चार्टर्ड अकाऊंटट अनिकेत सुळ,विधी तज्ञ ॲड सुप्रिया बर्गे, सामाजिक कार्यकर्ता रोहिणी कस्तुरे,यांना अहिल्यारत्न पुरस्कार तसेच समाजातील तळागाळातील प्रश्न मांडणारे दै. नवराष्ट्र/ नवभारत चे बारामती चिफ ब्युरो अमोल तोरणे, लोकांपर्यंत सामन्यांचा आवाज पोहोचवणारे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर रायते, पै.सागर वाघमोडे , सामाजिक कार्यकर्ते गणेश केसकर,महिला कुस्तीपटू पै.सायली जगताप, पै.वैशाली कारंडे यांना समाजरत्न पुरस्कार, यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
रंगतदार ठरलेला खेळ पैठणीचा विजेत्या बाबीर रुई च्या स्वाती गायकवाड ,उपविजेत्या ढेकळवाडी च्या अनिता गरदडे यांनी पटकावला. बाबीर तरुण गजे मंडळ वाळकी, तुळजाभवानी गजे मंडळ निकमवाडी यांनी रंगतदार गजी नृत्य सादर केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल झारगड,ढेकळवाडी च्या सरपंच अर्चना देवकाते,सणसर ग्रामपंचायत सरपंच यशवंत नरुटे,काटेवाडी सरपंच मंदाकिनी भिसे,निरावागज उपसरपंच सागर देवकाते,कळंब सरपंच विद्या सावंत, सा.कार्यकर्त्या ॲड.सुप्रिया बर्गे, ग्रा.जांब च्या सदस्य अश्विनी पाटील, सदस्य आशा रूपनवर ,मार्केट कमिटीचे संचालक दिलीप घुले,संचालक शुभम ठोंबरे,भाजपा तालुका अध्यक्ष फलटण चे बजरंगनाना गावडे, तरडोली विकास सोसायटी चे अध्यक्ष दत्तात्रय पुणेकर,सा.कार्यकर्ते ॲड.गोविंद देवकाते,शिवसेना उबाठा चे सोलापूर उपजिल्हाप्रमुख काकासो बुऱ्हाडे,भगवान घुले,राहुल घुले, सचिन गडदे, प्रमोद ठोंबरे ,सुरज सोट,नितीन जानकर,रोहन पांढरमिसे,अमोल घोडके,आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उत्सव कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या सर्व बंधू, भगिनी यांचे आणि हा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्व शुभचिंतक यांचे डॉ.सुजित वाघमोडे यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बुरुंगले व कुमार देवकाते यांनी केले.
साधी राहणी, उच्च विचारसरणीच्या अहिल्या मातेचे कार्य महान ,अठराव्या शतकातील जगातील उत्तम प्रशासक अहिल्याबाई होळकर – ॲड.रामहरी रूपनवर
अहिल्यादेवी होळकरांचा कार्यगौरव, संघर्ष व इतिहास जयंती उत्सव साजरा करत लोकांसमोर मांडता, एक दिवस आपल्या संघर्षाचा इतिहास लोक पुस्तकातून लिहतील – ॲड. रूपनवर
महाराष्ट्रात अनेक जयंती उत्सवाला उपस्थिती, मात्र अशी शिस्तबद्ध महिला नियोजित जयंती उत्सव कुठेही पाहिला नाही, प्रतिष्ठान च्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांच्या संघर्षाचे,कार्याचे केले कौतुक.