
लोकशासन-प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
पुण्यातील हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये दि.(१०) रोजी एक दिवसीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता. यामध्ये २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक जनजागृती पंधरावडा म्हणून साजरा केला जातो.या कालावधीमध्ये इंदापूर तालुक्यातील कॉलेज, हायस्कूल, शासकीय कार्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्राहक कायदा काय असतो, तो कसा वापरला पाहिजे, आरोग्या बाबतचे अधिकार, महसूल विभागातील अधिकार, याबाबत जनजागृती केली होती.
याबद्दल पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक इंदापूर तालुक्याला मिळाला आहे. हा पुरस्कार केंद्रीय सदस्य धनंजय गायकवाड, मध्य महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष विलास लेले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पुणे जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे, महिला पुणे जिल्हाध्यक्ष नयनाताई आभाळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बेंद्रे, पुणे जिल्हा सहसंघटक दिलावर तांबोळी, कृषी प्रमुख पुणे जिल्हा किशोर भोईटे, कोषाध्यक्ष राघवदास चौधरी, यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, संघटक सचिन रणसिंग, इंदापूर सचिव शत्रुघन घाडगे, कोषाध्यक्ष दादासाहेब भोंगळे,महिला इंदापूर तालुकाध्यक्ष अर्चना सपकळ, सचिव नाजिया सय्यद, संघटक पूनम गुप्ते, शालिनी साळुंखे, सणसर अध्यक्ष गणेश गुप्ते, मंगेश खरात, चांगदेव शिंदे, बाबुराव पोंदकुले, बेलवाडी चे अध्यक्ष नानासो कदम, सचिव गणेश भिसे, तानाजी खैरे, इंदापूर संघटक महेश काका सपकाळ, दिलीप दुपारगुडे, धनाजी घोडके, गणेश जाधव, आधी पुणे जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.