इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांची रक्कम काढण्यासाठी ससेहोलपट.

Spread the love

लोकशासनगणेश गुप्ते, उपसंपादक

भवानीनगर:(३०) इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांना रक्कम काढण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यानंतर अडचणींला सामोरे जावे लागत आहे.
भारतीय डाक विभाग व इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा एक कर्मचारी रक्कम काढण्यासाठी व भरण्यासाठी देण्यात यावा अशी मागणी खातेदारांकडून होत आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, लाडकी बहिण योजना, शेती पिकाचे नुकसान झालेले अनुदान यासारख्या योजनांसाठी हे खाते सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक ज्यावेळी अस्तित्वात आली त्यावेळी घरोघरी जाऊन पोस्ट ऑफिस मध्ये रांगाच्या रांगा लावून खाती काढण्यात आली मात्र सध्या ग्रामीण भागामध्ये या बँकेचे खाते काढल्याने खातेदारांच्या डोक्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष करून ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस मध्ये रक्कम काढून देण्यासाठी कर्मचारीच नसल्याने अनेक खातेदार संताप व्यक्त करत आहेत.
हे खाते काढत असताना डायरेक्ट आधार कार्डशी लिंक होत असल्याने शासनाचे येणारे अनुदान थेट याच खात्यामध्ये येत आहेत.
मात्र हेच अनुदान घेण्यासाठी खातेदारांची ससेहोलपट होत असून शासनाकडून आलेली हक्काची रक्कम देखील मिळताना खातेदारांना अति विलंब होत असल्याने अनेक खातेदारांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेबद्दल नाराजीचा सूर असून त्वरित ज्या ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे त्या त्या ठिकाणी स्वतंत्र कर्मचारीच नेमावा व सेवा सुरळीतपणे द्यावी अशी मागणी खातेदारांमधून होत आहे .

One thought on “इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांची रक्कम काढण्यासाठी ससेहोलपट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button