
लोकशासन-(प्रतिनिधी) किरण माने ,शेळगाव
शेळगाव : सोमवार (दि.२६) रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन श्री संत मुक्ताबाई मंदिराच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शेळगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच उर्मिला लक्ष्मण शिंगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी शेळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मॉर्डन स्कूल आणि स्मार्ट ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गावामधून “भारत माता की जय” च्या घोषणा देत प्रभात फेरी करण्यात आली.तसेच श्री संत मुक्ताबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजला मानवंदना दिली.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवरती लेझीम सादर केली.
शेळगाव येथे एकाच वेळी श्री संत मुक्ताबाई मंदिराचे ध्वजारोह चेअरमन कैलास चवरे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उपसरपंच रेश्मा जाधव,भैरवनाथ सोसायटी या ठिकाणी चेअरमन साहेबराव शिंगाडे यांच्या उपस्थितीत संचालक बाळासाहेब पोंदकुले तर तलाठी कार्यालय या ठिकाणी तलाठी गजानन चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील उषा वाघमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जोरदार नियोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांना कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ग्रामपंचायत च्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी संचालक ॲड.लक्ष्मणराव शिंगाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव जाधव,कर्मयोगीचे संचालक अंबादास शिंगाडे,ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप,माजी सरपंच रामदास शिंगाडे,ग्रामपंचायत सदस्य मोहन खराडे,प्रताप चवरे,स्वाती शिंगाडे,पंडित ननवरे,राजेंद्र चवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.