इंदापुर मधील कडबनवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात.

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी किरण माने, शेळगाव
शेळगाव :(२७) कडबनवाडी(ता.इंदापुर) येथे सोमवार (दि. २६) जानेवारी२०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. कडबनवाडीचे आदर्श सरपंच दादासो जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले.

तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक बाळासाहेब साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम संपल्यानंतर नितीन अशोक गावडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


यावेळी भजनदास पवार,माऊली चवरे, ग्रामपंचायत अधिकारी दादासाहेब गावडे,उपसरपंच आश्विनी येडे,पोलीस पाटील संतोष शिंगाडे,आप्पासाहेब गावडे,सचिन गावडे,मनोहर गावडे, शिक्षक बापूराव जाधव, वैभव कवितके,बाळासाहेब खोमणे,संध्या जाधव,बचत गटाच्या अध्यक्ष शितल जाधव,रेखा हगारे यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button