चंदुकाका सराफ नातेपुते शाखा व सत्यम फाऊंडेशन यांच्या कडून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

Spread the love

लोकशासन – उपसंपादक : गणेश गुप्ते, इंदापूर ग्रामीण

वालचंदनगर :(२६)निमसाखर (ता इंदापूर) येथील विठ्ठल मंदिर येथे चंदुकाका सराफ शाखा नातेपुते व “सत्यम फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने “मकर संक्रांतीच्या” औचित्याने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी हळदी कुंकू समारंभा निमित्ताने निमसाखर व परीसरातील माता भगिनी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी चंदुकाका सराफ शाखा नातेपुते यांच्या कडून हळदी कुंकू समारंभासाठी उपस्थित महिलांना स्टीलचे डब्बे वाण देण्यात आले.व सोने चांदी च्या गुंतवणूकी संदर्भातील माहिती व चंदुकाका सराफ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधा या बद्दल माहिती देण्यात आली.

यावेळी निमसाखर मधील सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका सत्यजीत रणवरे, प्रिती विक्रम रणवरे,अमृता रणवरे,मोनाली रणवरे,विद्या मोरे,अश्विनी मोरे,वृषाली हणमंते,सुनिता पवार,संगीता होमकर,प्रगती सुतार, स्वप्नाली चव्हाण,विद्या बंडगर आदी माता भगिनी व महिला वर्गासह चंदुकाका सराफ ज्वेलर्स चे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button