अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने प्रवासी दिन साजरा.

Spread the love


भिगवण गणेश गुप्ते (प्रतिनिधी):२५ इंदापूर तालुक्यामधील बेलवाडी व भिगवण बस स्थानक या ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांच्या वतीने प्रवासी दिन साजरा करण्यात आला.
बारामती- इंदापूर महामार्गावरील बेलवाडी या ठिकाणी सकाळी
इंदापूरच्या बसमधील चालक आणि वाहक यांचा सत्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलावर तांबोळी, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, आदींचे हस्ते करण्यात आला.

यावेळी बसमधील प्रवासी यांना प्रवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच एसटी बसनेच का प्रवास करावा याबाबत पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलावर तांबोळी यांनी याबाबत मार्गदर्शन केले तसेच एसटीने प्रवास केल्यास एसटीने प्रवास करणाऱ्या ग्राहकाला विम्याचे संरक्षण असते याबाबत माहिती पटवून दिली.
भिगवन बस स्थानका समोरील सोलापूर -पुणे मार्गावर बस थांबून चालक वाहक यांचा सत्कार करण्यात आला व प्रवाशांना गुलाब पुष्प, पाणी बॉटल, तिळगुळ वाटप करून अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांच्या वतीने प्रवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती संजय भापकर यांनी रस्त्यावरून चालत असताना फुटपाथ वापर करावा , रस्ता नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, वाहन चालवताना सीट बेल्ट लावून वाहन चालवावे व त्या नियमाचे पालन करावे, मोटर सायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा, विनाकारण हॉर्न वाजवू नये, ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सागर ठेंगील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, शुभम तांगडे मोटर वाहन निरीक्षक आरटीओ पुणे, महादेव तनपुरे चालक वायु वेग पथक दौंड आधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button