खासदार संजय राऊत यांच्या पुतळा दहनाविरोधात इंदापुरात शिवसैनिक आक्रमक; भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची पोलीस निरीक्षकांकडे मागणी

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याचे बेकायदेशीरपणे दहन करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आज इंदापूर तालुका शिवसेना व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना जाहीर निषेध निवेदन दिले.

दिनांक ४ जुलै २०२६ रोजी इंदापूर येथील तहसील कचेरीसमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत शिवसैनिकांनी पोलीस प्रशासनाकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.नि वेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, भाजप कार्यकर्त्यांनी केलेले हे कृत्य अत्यंत खालच्या पातळीचे, राजकीय वैमनस्य पसरवणारे आणि सार्वजनिक शांतता भंग करणारे आहे.लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु तहसील कचेरीसारख्या शासकीय व संवेदनशील जागेसमोर विनापरवानगी गैरकायद्याची मंडळी जमवून हुल्लडबाजी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

या घटनेमुळे इंदापूर तालुक्यासह राज्यभरातील शिवसैनिक व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवसेना व महाविकास आघाडीच्या प्रमुख मागण्या:१. विनापरवानगी आंदोलन करून सार्वजनिक शांततेचा भंग करणे व चिथावणीखोर कृत्य केल्याप्रकरणी संबंधित भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) व अन्य कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत.२. शासकीय जागेत हुल्लडबाजी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.प्रशासनाने या चिथावणीखोर कृत्यावर कठोर कारवाई केली नाही आणि भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस व तहसील प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या निवेदनाची प्रत इंदापूरचे तहसीलदार तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनाही माहिती व योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे, शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, उपतालुकाप्रमुख संदीप चौधरी, युवासेना शहरप्रमुख अविनाश खंडाळे, विभागप्रमुख दत्ता खुडे, विभागप्रमुख रणजित बारवकर, एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष दादा माने, मंगेश खरात, सतीश नामदास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क:8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button