वालचंदनगर पोलिसांचा शेतकऱ्यांची चोरी करणार्‍यांवर जरब ! सराईत चोर गजाआड

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-वालचंदनगर

वालचंदनगर : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेता मधील सौर मोटार पंप, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पिकअप, मोटार पंप केबल वायर तसेच इतर प्रकारच्या चोरीचे प्रमाण वाढले होते.या अनुषंगाने बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी वेळावेळी चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना कराव्यात तसेच दाखल करण्यात आलेले चोरीचे गुन्हे कसे उघडकीस आणता येतील याबाबत आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी वालचंदनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार दाखल चोरीच्या गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड व पोलीस शिपाई गणेश वानकर यांना गोपनीय बातमीदारा कडुन मिळालेल्या माहितीनुसार जयदीप नानासो घोळवे व त्याचे इतर दोन साथिदार यांनी मिळून लाकडी, शिंदेवाडी व भवानीनगर परिसरातील शेतक-यांच्या ट्रॉलीची चोरी केल्याची माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने वरील आरोपींचा शोध घेत असताना जयदीप नानासो घोळवे व मेघराज नानासो ओंबासे, रा. निंबोडी (ता. इंदापुर, जि. पुणे) हे दोघे भवानीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्या नंतर त्यांना भवानीनगर येथे ताब्यात घेवुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमधुन ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची ट्रॉली, चार चाकी पिकअप वाहन व मोटार पंप अशा वाहनांची चोरी केल्याची कबुली देत सदरील चो-या जयदीप घोळवे व मेघराज ओंबासे व त्याचा साथिदार आकाश विलास शिंदे रा. निंबोडी (ता. इंदापुर, जि. पुणे) असे मिळुन केल्याचे सांगितले.वरील आरोपींच्या विरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये १) गु.रजि. नंबर २२५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) , २) गु.रजि.नंबर ०५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) , ३) गु. रजि. नंबर ८१/२०२६ भारतीय न्याय संहित २०२३ चे कलम ३०३(२) गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी १) जयदीप नानासो घोळावे, वय २२ वर्षे, रा. निंबोडी ता. इंदापुर, जि.पुणे, २) मेघराज नानासो ओंबासे, वय २२ वर्षे, रा. निंबोडी ता. इंदापुर, जि. पुणे, ३) आकाश विलास शिंदे, वय २३ वर्षे, रा. निंबोडी ता. इंदापुर, जि. पुणे यांना दाखल गुन्हामध्ये अटक करुन त्यांच्याकडुन वेगवेगळया एक न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, एक चार चाकी ट्रॉली, एक महिंद्रा कंपनीचे पिकअप व एक सौर मोटार सौरपंप तसेच ट्रॉली चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्हामधील सर्व जप्त मुद्देमाल हा संबधीत फिर्यादी व शेतकरी यांना देण्याची कार्यवाही चालु असन दाखल गुन्हयाचा तपास अदयाप सुरू आहे.सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल माणेर, अजित भाग्यवंत, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, राहुल माने यांनी केली आहे. या कामगिरी बद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button