
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त इंदापूर महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा वेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो कार्यक्रम स्थळी प्रशासना कडून जाणून बुजवून वगळण्यात आल्याचा आरोप इंदापूर भाजप कडून करण्यात आला.तर राज्याचे मुख्यमंत्री, व बावनकुळे साहेब यांचा नाम उल्लेख टाळला गेल्याने भारतीय जनता पार्टी कडून निषेध व्यक्त करण्यात आला.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाची पिळवणूक चालू असुन कृषीमंत्री तालुक्याचे असताना देखील जास्त प्रलंबित रस्त्याची प्रकरणे तालुक्यात असुन टेबलावरती वजन ठेवल्याशिवाय शेतकरी बांधवांची कामे होत नसल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री डाॅ.आकाश कांबळे यांनी करीत मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याकडे तहसीलदार यांना निलंबित करण्याकरता न्याय मागणार असल्याचे सांगीतले.यावेळी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर इंदापूर तहसील कचेरी वरती निषेध स्वरूपाचा मोर्चा काढण्याचा इशारा दिला.उजनी जलाशया मधील वाळू उपसा तसेच तहसीलदार यांच्या संगनमताने अनेक व्यवसाय, रस्ते, जमिनी संदर्भातील वाद विवाद, महसूल खात्या अंतर्गत अनेक बारीक मोठे विषय तहसीलदार यांच्या वरदहस्ते व टेबलावरती वजन ठेवल्याशिवाय कामे होत नाहीत अशा प्रकारचा राजरोस धंदा हा दररोज चालू आहे ही सुद्धा इंदापूर तालुक्यातील जनतेची फसवणूकच असून लोकांना दमदाटी करण्याचा विडाच उचलायला आहे त्याला नेमका कोणाचा आहे आशीर्वाद आहे असा प्रतिप्रश्न यावेळेस कांबळे यांच्याकडून करण्यात आला.
यावेळी भाजप चे मंडल अध्यक्ष राजकुमार जठार,मंडल अध्यक्ष राम आसबे,युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मयुर शिंदे,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष लखन जगताप, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क:8007108688