
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण
इंदापूर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या नुकत्याच पदाधीकारी नियुक्त्या करण्यात आल्या असून पुणे जिल्हा किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष तानाजी थोरात यांची किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजप चे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कृषी मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी कार्यकारणी जाहीर केली असून तानाजी थोरात यांचे पक्षातील काम व जिल्हा अध्यक्षपदाचा अनुभव पाहता त्यांच्या वरती महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क : 8007108688