शिंदे गटाचे माजी इंदापूर शहरप्रमुख अशोक देवकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत घरवापसी इंदापूर |

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला इंदापूर तालुक्यात मोठे बळ मिळाले असून, शिंदे गटाचे माजी इंदापूर शहरप्रमुख तसेच समता परिषदेचे पुणे जिल्हा संघटक अशोक देवकर यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत घरवापसी केली आहे. इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख संजय काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवकर यांचा पक्षप्रवेश झाला.

यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक खरात, युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, युवासेना शहरप्रमुख अविनाश खंडाळे, शिवसेना उपशहरप्रमुख देवा मगर, विभागप्रमुख दत्ता खुडे, विभागप्रमुख रणजित बारवकर, उपविभागप्रमुख महादेव कचरे, मोहन आरडे, तात्या यादव यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.देवकर यांच्या घरवापसीने संघटनेला बळ अशोक देवकर हे इंदापूर शहर व तालुक्यात सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.त्यांच्या ठाकरे गटाच्या शिवसेनेतील पुनरागमनामुळे इंदापूर तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला आणखी बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.देवकर यांच्या घरवापसीकडे आगामी काळातील संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

तालुक्यात आणखी अनेक पक्षप्रवेश होणार — संजय काळेयावेळी बोलताना शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख संजय काळे म्हणाले, “अशोक देवकर यांचा आजचा पक्षप्रवेश हा सध्या प्राथमिक स्वरूपाचा आहे. देवकर यांच्यासह इंदापूर तालुक्यातील इतरही अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सध्या आम्ही संबंधित कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असून, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. आगामी काळात या सर्वांचा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे अधिकृत पक्षप्रवेश करण्यात येणार आहे.”‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानातून संघटन मजबूत करण्यावर भरइंदापूर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट तसेच इंदापूर शहरात ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे.या अभियानाच्या माध्यमातून वालचंदनगर, सणसर, भिगवण, भादलवाडी, लोणी देवकर, इंदापूर शहर, सुरवड, लाखेवाडी आणि निमसाखर या भागांमध्ये शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

या दौऱ्यात शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख संजय काळे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक खरात, विभागप्रमुख दत्ता खुडे आणि विभागप्रमुख रणजित बारवकर यांनी स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधला.बैठकांमध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करणे, शाखा विस्तार, बूथ कमिटी स्थापन करणे, नवीन पदनियुक्त्या करणे तसेच स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन अधिक सक्रिय करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

भिगवण येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवादभिगवण येथील बैठकीस युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. राहुल बंडगर, शिव आरोग्य सेनेचे तालुकाध्यक्ष डॉ. बाबासाहेब भोसले, भिगवण शहरप्रमुख रामचंद्र पाचंगणे, उपतालुकाप्रमुख पांडुरंग वाघ, फिरोज पठाण, पांडुरंग सोनवणे, बाळासाहेब कुसाळकर, प्रविण मोहिते, आदेश पवार, हृतिक पवार, प्रशांत पिसे, राहुल खरात, सोमनाथ शिंदे, नितीन सावंत आदी उपस्थित होते.इंदापूर शहरातील बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चाइंदापूर येथील बैठकीस युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, युवासेना शहरप्रमुख अविनाश खंडाळे, शिवसेना उपशहरप्रमुख देवा मगर, एस.टी. कामगार सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगेश जायभाय, युवासेना उपशहरप्रमुख अनिल भोई, विभागप्रमुख रणजित बारवकर, उपविभागप्रमुख महादेव कचरे, मोहन आरडे, तात्या पाटील, नागेश जाधव, गोवर्धन खंडाळे आदी उपस्थित होते.

सुरवडमध्ये युवक व पदाधिकाऱ्यांची उपस्थितीसुरवड येथील बैठकीस एस.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष दादा माने, राहुल जाधव, पवन जाधव, गोरख जाधव, पवन गायकवाड, सुरज जाधव, ओंकार जाधव, अक्षय साळुंखे, संकेत जाधव उपस्थित होते.लाखेवाडीमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभागलाखेवाडी येथील बैठकीस युवानेते अक्षय पवार, राजेंद्र ढोले, संतोष परखडे, विश्वास ढोले, सुधीर घोगरे आदी युवक उपस्थित होते.निमसाखरमध्ये संघटनात्मक बांधणीवर भरनिमसाखर येथील बैठकीस अरविंद अडसूळ, उपविभागप्रमुख तुषार दळवी, शाखाप्रमुख युवराज अडसूळ, सागर रणवरे, नंदकिशोर गायकवाड, शुभम कदम, अभिषेक सूर्यवंशी, यश जगताप आदी उपस्थित होते.आगामी काळात संघटन विस्ताराचा वेग वाढणारइंदापूर तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आगामी काळातही विविध उपक्रम व अभियानांच्या माध्यमातून सातत्याने काम केले जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय काळे यांनी स्पष्ट केले.शाखा विस्तार, बूथनिहाय संघटन मजबूत करणे, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे तसेच स्थानिक पातळीवर शिवसैनिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यावर पक्षाकडून भर दिला जात आहे.आगामी पक्षप्रवेशांकडे राजकीय वर्तुळाचे लक्षअशोक देवकर यांच्या घरवापसीमुळे इंदापूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील शिवसेना संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या संघटनात्मक हालचाली आणि आगामी काळात होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशांमुळे इंदापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.— शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), इंदापूर तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button