पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना केंद्र सरकारचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना केंद्र सरकारचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ पोलीस विभागात दीर्घकाळ निष्कलंक व उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राज्य राखीव पोलीस बल क्र ८ चे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुलाब गायकवाड यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्ध सेवेला मिळालेली ही पावती असल्याची भावना गायकवाड यांनी व्यक्त केली. “दीर्घकाळ प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेल्या सेवेला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवा पदक मिळणे, ही माझ्यासाठी समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. हा सन्मान माझ्या सेवाकार्यात सातत्याने प्रोत्साहन देणारा आहे.वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली,” अशी प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली.गायकवाड यांनी पोलीस सेवेत कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि कर्तव्य बजावताना शासकीय नियमांचे पालन करण्यावर भर दिला. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने त्यांची उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड केली.

गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश माने,महेश पन्हाळे,हवालदार विनोद चव्हाण,विकास चडचणकर ,गणेश मोरे ,नानासो कवळे,ॲड संदिप रुपनवर,संतोष भिसे ,रणजित रुपनवर,कुणाल कातकडे ,वैभव माने,महेश चव्हाण,भगवान मोरे ,लक्ष्मण गायकवाड,रेश्मा गायकवाड,आशा खरात,रिया गायकवाड,सोनाक्षी गायकवाड यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button