

लोकशासन: गणेश गुप्ते, उपसंपादक
भवानीनगर:( ३१) अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य कामे देऊ नयेत व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे अंगणवाडी सेविका मार्फत ई-केवायसी करिता प्रत्यक्ष पडताळणीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्यामार्फत ब्रुजपान सिंह, दिलीप उटाणे,शुभा शमीम,कमळ परूळेकर, भगवान देशमुख, जयश्री पाटील, जीवन सूरूडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, मंत्रालयातील मुख्य सचिव, महिला व बाल विकास विभाग सचिव, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त, पुणे आयुक्त महिला व बालविकास विभाग, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सर्व विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास विभाग सर्व, मुख्याधिकारी जिल्हा परिषद , जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद , बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण ,नागरी ,शहरी, आदिवासी, यांना याबाबत निवेदन पाठवण्यात आलेले आहे.
हे निवेदन दि.३०जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महिला व बाल विकास विभाग भारत सरकारने पोषण 2.0 अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदारी निश्चित केलेले आहेत.
लेक लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ,पंतप्रधान मातृत्व योजना, शाळाबाह्य मुलांचे सर्वे, राज्यातील महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करणे, आदिशक्ती ग्रामपंचायत योजना राबवणे ,एकल महिला सर्वे करणे, दिव्यांग सर्वे ,सौचालय सर्वे वृक्षारोपण, निवडणुकीचे काम, आबा कार्ड तयार करणे अशा कामांचा बोजा अगोदरच अंगणवाडी कर्मचारी यांच्या वरती असून त्यामध्येच राज्यात कुपोषणामुळे बालक गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे मृत्यू होत असल्याकारणाने त्याचे निरीक्षण मा. उच्च न्यायालयाने सुद्धा नोंदवलेले आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सुमारे १९५ बालकांचा मृत्यू कुपोषणाशी संबंधित कारणामुळे झाला आहे .
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य माणसांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे राज्यात आदिवासी, दुर्गम, आणि ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे या परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजने व्यतिरिक्त अन्य काम दिले गेले तर परिस्थिती अजूनही अवघड होऊ शकते.
दि.४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप व वेळ ठरविण्यात आलेले आहे त्यांना अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना दर दिवशी ६ सेवांचे फायदे द्यावे लागतात त्यामध्ये अंगणवाडी केंद्र उघडणे, दैनंदिन कामकाज, ३ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांची उपस्थिती भरणे, गरम ताजा आहार शिजवून वाटप करणे व ती माहिती पोषण ट्रॅकर ॲप मध्ये भरणे ,वजन व उंची भरणे, व्हीएचएसएनडी कार्यक्रम घेणे, दर दिवशी गृहभेटी करणे, लसीकरण, आभा कार्ड तयार करणे,३ते६ वयोगटातील लाभार्थ्यांना दर दिवशी किमान अडीच तास पूर्व प्राथमिक शिक्षण देणे असा बाहर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती आहे.
हे काम न केल्यास अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढू शकते ते शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे त्याची सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविका वर येते.
एक हजार लोकसंख्येच्या मागे एक आंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आली आहे या परिस्थितीत अंगणवाडी सेविकांना जर योजनाबाह्य कामे दिली गेली तर त्या ठिकाणी लाभार्थ्यांना दैनंदिन सेवा देणे शक्य होणार नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजना व्यतिरिक्त काम देण्यात येऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत.
त्यातच अधिकचा भार म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कोणतीही योजना बाह्य काम देण्यात येऊ नये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी सक्तीने करायला भाग पाडल्यास त्यावर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.