
लोकशासन-नाजिया सय्यद,पत्रकार
उद्धट:(०२) जिल्हा परिषद गट सणसर-लासुर्णे या भागामधील मतदारांचा चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टी ला प्रतिसाद मिळत असून अनेक तरुण यामध्ये सहभागी होत या गटाची जबाबदारी स्वतः मतदारांनीच हाती घेतली असून अनेक मतदार देखील स्वतः घराच्या बाहेर पडून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करीत आहेत असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद गट अधिकृत उमेदवार धनश्री संदीप कांबळे तसेच सणसर गणातील पंचायत समिती उमेदवार पुनम अनिल शेंडगे यांनी यांनी आपले मत व्यक्त केले.
आज दि.(०२) रोजी भाग्यनगर, अशोकनगर ,भवानीनगर, संजयनगर, उद्धट, तावशी, सणसर ,हिंगणेवाडी,उदमाईवाडी, या भागामध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.
यामध्ये भारतीय जनता पार्टी ला चांगला प्रतिसाद मिळत असून आमच्या सर्वसामान्य उमेदवारांवर विश्वास दाखवला यामुळे निश्चितच आम्ही हा विश्वास सार्थ करू तसेच आगामी काळात देखील निश्चितच भारतीय जनता पार्टी च्या वतीने चांगले काम या गाणामध्ये करुन दाखवु असा विश्वास पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार पूनम अनिल शेंडगे तर जिल्हा परिषद गट सणसर-लासुर्णे धनश्री संदीप कांबळे यांनी व्यक्त केली.