
लोकशासन – प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
इंदापूर : लाखेवाडी (ता.इंदापुर) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.इंदापुर तालुक्याचे आमदार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रताप पाटील,प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या सह अनेक राजकीय, सामाजिक व प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून साधारण चार वर्षांपासून रिक्त असलेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा निवडून आलेल्या उमेदवारांनी ०९ मार्च रोजी पदभार स्वीकारला आहे.इंदापुर पंचायत समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन लोंढे तर उपसभापती पदी जयकुमार कारंडे यांची निवड झाली असून लाखेवाडी येथे झालेल्या छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियानातील भाषणा दरम्यान तहसीलदार बनसोडे कडून सभापती व उपसभापतींचा नामोल्लेख टाळला गेल्याने तहसीलदारांन विषयी नाराजीचा सूर पसरला.
सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न त्वरीत निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे व प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना विविध दाखले आणि सेवा एकाच दिवसात उपलब्ध करून देणे सेवा पुरविणे या उद्देशाने मार्च ते मे या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद व नगर पंचायत पातळीवर “छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8007108688