
लोकशासन-गणेश गुप्ते , प्रतिनिधी
भवानीनगर:(४) इंदापूर तालुक्यात बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करूनही नोंद होत नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया पुढे येत आहे.
Election Commission of India यांच्या नियमांनुसार नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे व दुरुस्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात ऑनलाईन अर्ज सादर होत नाही BLO यांच्याकडे गेल्यास उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत.
मतदार नोंदणीचा खेळखंडोबा?
ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतरही स्टेटस “Pending” दाखवते.
BLO कडे चौकशीसाठी गेल्यावर ठोस उत्तर मिळत नाही.
वारंवार भेटी देऊनही अर्जाची दखल घेतली जात नाही.
“आम्ही ऑनलाईन अर्ज केला, कागदपत्रे अपलोड केली; तरीही महिनोनमहिने काहीच हालचाल नाही. BLO कडे गेल्यावर स्पष्ट उत्तर मिळत नाही. मग न्याय मागायचा कुणाकडे?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
सध्या अनेक कामकाजासाठी मतदान कार्ड हे गरजेचे झाल्याने यासाठी विलंब लागत असून त्यात महा-ई- सेवा केंद्र मध्ये गेल्यास ऑनलाईन फॉर्म सबमिट होत नाही.
BLO यांच्याकडे गेल्यास टाळाटाळ केली जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे यावरती इंदापूर तालुका प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन यावरती उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
विशेष म्हणजे अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15 ते 30 दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित आहे.
इंदापूर तालुक्यात मतदार नोंदणी प्रक्रियेतील कथित कुचराई आता केवळ प्रशासकीय प्रश्न न राहता कायदेशीर चौकटीत तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. ऑनलाईन अर्ज प्रलंबित ठेवणे, घरभेट न करणे, अर्जदारांना योग्य माहिती न देणे या प्रकारांमुळे मतदारांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचा आरोप होत आहे.
एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि माझ्या आईचे मतदान कार्ड आहे मला फक्त जन्म तारीख दुरुस्ती करायची आहे मात्र मला गेल्या चार दिवसांपासून टोलवाटोलवी केली जात आहे तसेच BLO म्हणतात तुम्ही ”इंदापूर ला जा इंदापूर ला गेलो तर ते म्हणतात तुम्ही BLOकडे जा आम्ही नेमकं जायचं कोणाकडे?असा सवाल नागरिकांनी केला आहे.