
लोकशासन-गणेश गुप्ते,प्रतिनिधी
भवानीनगर:(०२) इंदापूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, लाकडी या शाळेने यावर्षी राष्ट्रीय शिष्यवृत्ती (N.M.M.S.) परीक्षेत ऐतिहासिक यश संपादन करत तालुक्यात सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, शाळेच्या 30 पैकी तब्बल 27 विद्यार्थ्यांनी भरघोस गुणांसह यश मिळवले आहे.
शाळेचा एकूण निकाल 90 टक्के लागला असून, हा शाळेच्या इतिहासातील सर्वोच्च निकाल ठरला आहे.
गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी:
गौरी संजय वनवे – 134 गुण
प्रणव संतोष मोरे – 130 गुण
अंकिता बापूराव वनवे – 130 गुण
मयुरी सचिन वनवे – 129 गुण
अभिषेक भागवत कुंभार – 126 गुण
प्रियांशू अनिल शिंदे – 117 गुण
नवनाथ आबा कोळेकर – 116 गुण
मोनाली बाळासाहेब तांबे – 114 गुण
संग्राम हरिदास भारती – 112 गुण
मेघराज सुनील मोरे – 111 गुण
प्रतीक अमर वनवे – 109 गुण
अथर्व गणेश पवार – 102 गुण
तनया संदीप वनवे – 100 गुण
श्रावणी सोमीनाथ बांगर – 97 गुण
श्रावणी हनुमंत डोळे – 96 गुण
साईराज दादासो वनवे – 90 गुण
अनुष्का नवनाथ वनवे – 86 गुण
सायली भास्कर वनवे – 85 गुण
विजय पोपट चव्हाण – 84 गुण
दिपाली प्रदीप चौरे – 83 गुण
प्रज्वल महेंद्र वनवे – 81 गुण
गौरव संजय वनवे – 80 गुण
सोहम मनोज घोळवे – 78 गुण
सिद्धी गणेश आटोळे – 76 गुण
श्रीराज प्रशांत शिंदे – 75 गुण
अनुष्का राजाराम वनवे – 74 गुण
मोनाली अशोक मुंडे – 72 गुण
संस्थेचे अभिनंदन
या अभूतपूर्व यशाबद्दल ग्राम विद्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब ढोले, सदाशिव ढोले, उपाध्यक्ष रामचंद्र वनवे, सचिव नानासाहेब वनवे, संचालक संजय ढोले, मनोहर सांगळे व आबासाहेब ढोले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना संजय रोडे, किशोर टकले, उत्तम वायाळ, बालाजी हजारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक बापूराव ढोले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
विशेष उल्लेख
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळाच्या जोरावर मिळवलेले हे यश तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, लाकडीने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत इंदापूर तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.