
लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
भवानीनगर ते शेटफळकडे रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा अशी बातमी ३० एप्रिल २०२५ रोजी लोकशासन मध्ये प्रकाशित करण्यात आली होती.याच बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग भिगवन खडबडून जागे झाले असून हा रस्ता दिनांक ११ में रोजी रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम सुरू करण्यात आले.
सणसर येथील भैरवनाथ यात्रेच्या दिवशी यात्रेसाठी जात असताना एक मोटार सायकल स्वार गायकवाडवस्ती नजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये मोटरसायकल स्वार रस्त्यावरती अंधार असल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने या खड्ड्यामध्ये मोटरसायकल जाऊन दुखापत झालेली होती.यानंतर स्थानिकांच्या मदतीने या मोटरसायकल स्वराला बाहेर काढण्यात आले. व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
याबाबत लोकशासन कडून बातमी देखील प्रकाशित करण्यात आली होती याचीच दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग ने तातडीने अर्धवट स्वरूपात राहिलेले निंबोडी ते भवानीनगर या रस्त्याचे काम सुरू केले आहे.