
लोकशासन-इंदापूर ग्रामीण
भारत चिल्ड्रन्स अॕकॅडमी वालचंदनगर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिनांक ५ मे २०२५ ते ९ मे २०२५ या कालावधीत पाच दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील दहा विद्यार्थिनींनी भारतीय विद्यार्थ्यांना बॅटरीज, पूल, वेबसाईट, ऑटोमाटा, बाटली रॉकेट्स, वैद्यकीय उपकरणे, प्रोपेलर, टॉवर्स, ब्रेक, रोलर कोस्टर, सर्किट्स, त्रेबुचेट, रोबोट्स यासारख्या अभियांत्रिकी विषयांवरील संकल्पनांचे प्रशिक्षण दिले होते.
या सर्व परदेशी विद्यार्थिनींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते. मिशिगन इंजिनिअरिंग विद्यापीठातील जेड फ्राइडलिस, कामाक्षी अटी, संजना दतला, साशा हिल, अॅलिस इव्हानित्स्की, साशा ली, कॅथलीन लाइटन, सामंथा निकोल लोरझानो, अनघा नायर, मॅकेंझी वोमॅक या विद्यार्थिनींनी प्रशिक्षण दिले होते.

या विद्यार्थिनींना भारतीय संस्कृतीविषयी आकर्षण असल्यामुळे दुपारच्या सत्रांमध्ये मेहंदी काढणे, रांगोळी रेखाटणे, साडी नेसणे यांसारख्या भारतीय पारंपरिक कृतींचाही समावेश करण्यात आला होता. याशिवाय भारतीय संस्कृती, भारतीय राज्यव्यवस्था, अमेरिका व भारतीय शिक्षणपद्धतीतील फरक या विषयांवरही चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमाची सुरुवात २०१३ साली वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांच्या संकल्पनेतून झाली होती. यंदाचे शिबीर वालचंदनगर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर राजन, मनुष्यबळ विभाग प्रमुख विनायक बुधावंत तसेच शाळा समितीचे अध्यक्ष पंकज पवार व उपाध्यक्ष गणेश डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी प्रशासन प्रमुख विजय धामणकर, अनिता राव, प्रशांत महामुनी, भारती पटेल, जोएल गडगे, अप्पासाहेब मानकरी, शिवकुमार पाल, इम्रान खताळ, ज्ञानेश्वर सरटकर आदी कंपनी अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.
शाळेच्या वतीने प्राचार्य क्षीरसागर, पर्यवेक्षक अमोल गोडसे, प्रेमा सिंह, प्रचना माळशिकारे यांचेही मोलाचे योगदान लाभले होते.पाच दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिराची सांगता समारोप कार्यक्रमाने शेवट झाला.