सोमवार पासून उदमाई देवी यात्रेला सुरुवात

Spread the love

लोकशासन – इंदापूर ग्रामीण

वैशाख शुद्ध पौर्णिमेला उदमाई देवी यात्रा उत्सवाला सुरुवात होत असून हा यात्राउत्सव सोमवार दि १२ मे ते १४ मे असा तीन दिवस सुरू राहणार असून आत्तापासूनच भाविकांना या यात्रेची ओढ लागली आहे.

सोमवारी पहाटे पाद्यपूजा व महापूजा होऊन देवीच्या पालखीचे उद्घट गावाहून वाजत गाजत प्रस्थान होईल. सायंकाळी दारूगोळा आतीषबाजी पहायला मिळणार आहे.मंगळवारी पहाटे चार वाजता देवीचा भव्य छबीना व महापूजा होणार असून या तीन दिवसाच्या काळात कुस्त्यांचे जंगी मैदान, ऑर्केस्ट्रा,तमाशा अशा अनेक विविध मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीने केले आहे.

गावोगावी चाललेल्या यात्रांची सांगता उदमाई देवीच्या यात्रेने होत असल्याने या यात्रेला हिंगणेवाडी,सपकळवाडी मानकरवाडी,तावशी, कुरवली,थोरात वाडी,जांब,चिखली इ. परिसरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी होतअसते.

नवसाला पावणारी देवी म्हणून उदमाई देवीचा नावलौकिक असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्ती भावाने या यात्रेत सहभागी होतात. संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाईन केली असून आतापासूनच मंदिराचा परिसर खेळण्याची खेळण्याची दुकाने, हॉटेल्स,पाळणे, यांनी फुलायला सुरवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button