
लोकशासन – प्रतिनिधी:शंकर जोग, पुणे
पुणे : मंगळवार पेठ येथील अमर वाईन शॉप बंद करावा किंवा स्थलांतरित करावा या संदर्भाचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे स्थानिक नगरसेविका कल्पना दिलीप बहिरट यांनी दिले.या दारूच्या दुकानामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते तसेच ज्येष्ठ नागरिकांना तसेच परिसरातील नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतो.महिलांना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.हे दुकान कायमस्वरूपी बंद करावा अथवा दुसरीकडे स्थलांतरित करावे अशा आशयाचे निवेदन नगरसेविका कल्पना बहिरट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक महिला, पुरुष, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर दारूचे दुकान बंद करण्यासाठी १३ मार्च रोजी समर्थ पोलीस ठाण्यासमोर नगरसेविका कल्पना बहिरट यांनी धरणे आंदोलन केले होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :8007108688