ब्रदर देशपांडे चर्च च्या ५९ वा वर्धापन दिना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:शंकर जोग,पुणे

पुणे : कसबा पेठ येथील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च च्या ५९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चर्चला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.

यावेळी चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सुवार्ता दिंडीचे आणि विशेष प्रार्थना, भक्ती गीत आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी पुणे धर्म प्रांताचे बिशप रेव्ह,आल्फ्रेड तिवडे यांच्याद्वारे प्रार्थना करून मंडळीत ऐक्य, प्रीती, प्रेम, सलोखा, असणे महत्त्वाचे आहे असे विशेष संदेश देण्यात आले होते. यावेळी फादर सुनील चोपडे, सचिव सुनील भंडारे, खजिनदार राजेंद्र शिंदे, सहसचिव सुनिता सत्राळकार, ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चचे माजी सचिव, व सभासद नोएल देठे, पीटर जाधव, सुनील पवार, आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button