लामजेवाडी येथे १९ मे ला लोकशाही दिन ! नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी इंदापूर प्रशासन सज्ज

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण

शासनाच्या आदेशानुसार आणि जनतेच्या प्रश्नांना प्रशासनाच्या स्तरावर तातडीने व सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी येत्या १९ मे रोजी लामजेवाडी (ता. इंदापूर) येथे तालुकास्तर लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व विनंत्या ऐकणार असून त्यावर जागेवरच निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती इंंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

भिगवण- बारामती रस्त्यावरील लामजेवाडी गावाील जि. प. शाळेसमोरील हनुमान सभामंडपात सकाळी 11 वाजता हा लोकशाही दिन होणार आहे. सकाळी ते या वेळेत या कार्यक्रमासाठी तालुका स्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात उत्पन्न, जात, निवासी, अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज, शिधापत्रिका (रेशन कार्ड) संबंधी तक्रारी, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षणविषयक अडचणी, जमिनीच्या मोजणी, फेरफार, सात-बारा उतारे व इतर महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, विविध शासकीय योजनांसाठी अर्ज आणि मार्गदर्शन तसेच वृध्द, विधवा व अपंग पेन्शन अर्ज सादर करण्याची संधी नागरिकांना उपलबध्द होणार आहे.

या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे व आपले प्रश्न व अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात. सर्व अर्जदारांनी त्यांच्या तक्रारींशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची प्रत सोबत आणावी, जेणेकरून कार्यवाही सुलभ होईल, असे आवाहन तहसीलदार बनसोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button