
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
पुणे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती ऑनलाइन पेमेंट स्वीकारत नाहीत.त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवरती ऑनलाइन पेमेंट स्वीकारत नसल्याने ग्राहक आणि पेट्रोल पंपा वरील कर्मचारी यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी खरेदी करत असताना फोन पे, गुगल पे, पेटीएम , डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,किंवा प्रत्येक बँकेचे ॲप वापरले जाते.सध्या डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये दररोज हजारो ग्राहक पेट्रोल पंपावर विविध अँप द्वारे पेमेंट करतात. देशातील आर्थिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंप चालकांना कठोर सूचना केले आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंप चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेले ग्राहक आरोप करीत आहेत. विविध कारणे सांगून डिजिटल पेमेंट बंद असल्याचे कारणे पुढे केली जात आहेत.
मात्र अशातच सर्वच व्यवहार सध्या डिजिटल स्वरूपात ग्राहक करीत असून ग्राहकांची विनाकारण अडवणूक केली जात असल्याचे ग्राहकाकडून बोलले जात आहे. मात्र अशा पद्धतीचे डिजिटल पेमेंट पेट्रोल पंप चालकाने न स्वीकारल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत पंप चालकांनी पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी केंद्र सरकारने लागू केलेले ऑनलाइन पेमेंट (चलन) नाकारल्यास पंपचालकावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच पेमेंट नाकारलेल्या पंपचालकांचे परवाने ही रद्द होऊ शकतात.
मात्र पंप चालकांचा निर्णय सरकारला वेठीस धरण्याचा होता कारवाईच्या भीतीपोटी आणि नाइलाजाने पंपचालकांनी ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ञांनी दिली.
पॅट्रोल पंपावरती अग्निशामक असणे अनिवार्य असताना पॅट्रोल हे अतिशय ज्वलनशील असुन उष्णतेच्या तीव्रतेने चाळीशी पार केली असताना अनेक पॅट्रोल पंपावरती अग्निशामक (गॅस) असल्याचे दिसत नाही तर काही ठिकाणी हे फक्त दिखाऊपणा साठीच ठेवलेले असुन ते बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्वरीत इलाज करणे शक्य होणार नाही.त्यामुळे पंप चालका वरती कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांन मधुन होत आहे.