
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील अनेक बस त्यांना नेमून दिलेल्या थांब्यावरती थांबत नाहीत अशा बस बसथांब्यावर न थांबल्यास इंदापूर आगार कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
दि.(१२) संध्याकाळच्या वेळी काही महिला वडापुरी, शेटफळ हवेली, सुरवड, ला जाण्यासाठी थांबल्या होत्या.त्याचवेळी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण निर्माण झाले विजादेखील चमकण्यास सुरुवात होऊ लागली अंधार पडत चालला होता अशावेळी इंदापूर वरून अकलूज कडे जाणाऱ्या एसटी बस बस थांब्यावर न थांबता निघून गेल्या त्यामुळे महिला भयभीत झाल्या व खाजगी वाहन शोधण्यासाठी त्यांचे धावपळ सुरू झाली ही बाब अत्यंत गंभीर असून त्या एसटी वाहनचालकावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नितीन शिंदे इंदापूर तालुक्यातील शिवसैनिक व घटनास्थळावरती थांबलेल्या महिला यांनी इंदापूर आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. यापुढे सर्व बस प्रत्येक थांब्यावरती थांबाव्यात असे आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत. संबंधित चालक वाहक यांच्यावर कारवाई केल्याचे लेखी पत्र आम्हाला मिळावे. अन्यथा कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने आंदोलन करण्यात येईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी आपले राहील असे निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.
