
लोकशासन- प्रतिनिधी : शंकर जोग,पुणे
पुणे महापालिकेवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा झेंडा फडकणार असून कार्यकर्त्यांनी एकत्र राहून पक्षाची ताकद वाढवावी पक्ष बळकट करून पक्षाच्यावतीने महापालिका, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत, समिती, या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून द्यावे, आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा झेंडा पुणे महानगरपालिकेत फडकणार असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
आगामी निवडणूक लढवण्यासंदर्भात पुढील सूचना दिल्या,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजन करण्यात आली होती, यामध्ये संघटन बांधणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विषयी बैठक पार पडली.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट, डॉ, सुरेश माने यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करून त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले होते,यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पुणे शहराध्यक्ष अमोल तुजारे, विजय जगताप महासचिव पुणे शहर, अभय शेलार सचिव पुणे शहर, प्रकाश रास्ते अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा, संदीप गंगावणे अध्यक्ष वडगाव शेरी विधानसभा, दत्तात्रय शिंदे अध्यक्ष भोसरी विधानसभा, रवी कांबळे अध्यक्ष पुणे जिल्हा, अंबादास बनसोडे, अध्यक्ष पुणे जिल्हा अधिवक्ता आघाडी मिलिंद माचले पुणे जिल्हा शिक्षक, अरुण गायकवाड सचिव पिंपरी चिंचवड, इत्यादींची नियुक्ती करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज बगाडे सचिव, महाराष्ट्र प्रदेशबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांनी केले.
