लोकशासन – इंदापूर ग्रामीण
शासनाने अकलूज ते इंदापूर संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी टोलमुक्त करावा या मागणीसाठी शिवसेना इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे, युवासेना सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, सचिन इंगळे, संदीप चौधरी, महादेव लोखंडे, दत्ता साळुंखे, मिलिंद मोरे, शेखर खिलारे यांच्या वतीने सराटी येथील टोलनाक्यावर भिक मागो आंदोलन करण्यात आले.
वारकऱ्याचे गोरगरिबांचे आराध्य दैवत हे पंढरपूरचा पांडुरंग असून सध्या आषाढी वारी ही जवळच आली आहे इंदापूर ते अकलूज हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा ३० किमी चा असून या मार्गांवरून संत तुकाराम महाराज पालखी व अनेक शेकडो पालख्या जात असतात आणी याच पालखी मार्गांवरून वर्षभर लाखो वारकरी भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात.त्यामुळे सरकारने हा अकलूज इंदापूर ३० किमी चा पालखी मार्ग कायमस्वरूपी टोल मुक्त करावा व याचा आर्थिक भार सरकारने उचलावा.
सध्या याच पालखी मार्गांवर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे ते काम पूर्ण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टोल नाक्यावर भिक मागून जी रक्कम गोळा झाली आहे ती रक्कम सरकारला पाठवण्यात येणार आहे व त्यातून सरकारने अपूर्ण पालखी मार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे.
यावेळी युवराज पवार सचिन भोसले बिपीन बोरावके अशोक भोई लालासाहेब भोई प्रशांत पराडे अप्पा महाडिक ओम पराडे बन्सीलाल भोई पिंटू भोई विकास भोई अमित भोई जोतिराम पराडे विशाल चौधरी उपस्थित होते.

यावेळी टोलनाका कंपनी कडून हुले कन्स्ट्रक्शन चे जनरल मॅनेजर सचिन पडवळ यांनी सांगितले की केंद्र शासनाने दिलेल्या नियमांच्या अधिन राहुन हा टोल सुरू करण्यात आला आहे.या आगोदर देखील टोल संदर्भात आंदोलन झालेले आहे.रस्त्याच्या कामा संदर्भात आंदोलकांची जी भुमिका आहे ती त्यांनी राष्ट्रीय महामार्गाकडे मांडावी.टोलच्या विस किलोमीटरच्या परिघातील वाहनांना कारसाठी ३५० रुपयांचा पास राहिल.रस्त्याच्या टोल वसुलीचे काम हुले कन्स्ट्रक्शन ला भेटलेले असुन यात बावडा, अकलूज,सराटी असु द्यात कोणालाही सुट्ट मिळणार नाही.केंद्र शासनाचे व राष्ट्रीय महामार्गाचे जे नियम आहेत त्या नुसार सक्तीने अंमलबजावणी करुन आम्ही वसुली करणार आहे.सध्या जी वसुली चालू आहे ती जेवढे काम झाले आहे त्याच अनुषंगाने टोल वसुली चालू आहे.