
लोकशासन- प्रतिनिधी,इंदापुर ग्रामीण
इंदापूर – सरडेवाडी (ता.इंदापूर) येथील चेतना फाउंडेशन संचलित, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि चेतना ज्युनिअर कॉलेज येथे गुरुपौर्णिमा अतिशय उत्तम साजरी करण्यात आली.
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ तसेच माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धन पाटील साहेब यांनी भूषविले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या निकिता माने आधी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील साहेब यांनी गुरूंचे महत्त्व सांगितले व ग्रामीण भागातील मुलांचे कौतुक केले व जीवनात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये बारावी मधील गुणवंत विद्यार्थी तसेच डी .फार्मसी मधील प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली.
फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा.प्राजक्ता झगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.