दलित सेना व इतर पक्ष संघटना कडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी: शंकर जोग,पुणे

पुणे : दलित सेना व इतर पक्ष संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तीव्र आंदोलन महसुली अधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या क्षेत्रातील काही क्षेत्र नोटीस न देताच वजा केल्याचा प्रकार घडला, त्याच्या निषेधार्थ दलित सेनेने व इतर पक्ष संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केली तसेच पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले.

मुळशी तालुक्यातील नांदे गावातील दलित सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीचे काही क्षेत्र मुळशीतील तहसीलदार, तलाठी यांनी नोटीस न बजावता वजा केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आश्वासने देऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची खंत आंदोलन करत असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी न्याय द्या न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दलित सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील यादव, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, आर,पी,आय,चे शैलेंद्र चव्हाण, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बनकर, काँग्रेसचे अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुजित यादव, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते वसंत साळवे, दलित सेना जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार, छत्रपती शिवाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास काशिनाथ हगवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुरेखाताई दमिष्टे, निलेश दमिष्टे, आदि उपस्थित होते.दरम्यान जिल्ह्यातील पाच वर्ष जुन्या तलाठ्यांनी केलेल्या नोंदी, तहसीलदार आणि प्रांतअधिकारी यांनी दिलेल्या आदेशांची तपासणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button