
लोकशासन- प्रतिनिधी इंदापूर ग्रामीण
इंदापुर : कडबडवाडी (ता. इंदापूर) येथील भारतीय जनता पार्टीसाठी ३० वर्ष एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेले ,सध्या भाजपाच्या राज्य परिषद सदस्य म्हणुन ज्ञानेश्वर (माऊली) हरिभाऊ चवरे यांची निवड झाली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या राज्य परिषद सदस्य २०२५-२८ म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह महाराष्ट्रातील पक्षामध्ये दिग्गज नेत्यांसह ४५४ सदस्यांची निवड झाली आहे.
यापुर्वी ज्ञानेश्वर चवरे यांनी कडबनवाडी ग्रामपंचायत सदस्य ते इंदापूर भाजपा तालुकाध्यक्ष ,सन २०१४ मध्ये इंदापुर विधानसभा लढवली , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सह अन्य पदांवर काम करत असताना पक्ष मजबुत करण्याकडे विशेष लक्ष दिले. याची पोचपावती म्हणून पक्षाने संघटनेच्या राज्य परिषद सदस्य म्हणून ज्ञानेश्वर (माऊली) हरिभाऊ चवरे यांची निवड केली आहे.
तालुक्यातुन आत्तापर्यंत राज्य परिषद सदस्य म्हणुन प्रथमच निवड झाल्याने निवडीबद्दल तालुक्यातून शुभेच्छा वर्षा होत असुन दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वाढणे यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.