
लोकशासन – उपसंपादक:गणेश गुप्ते
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सणसर (इंरिकेशन बगला) येथील बारामती- इंदापूर महामार्गालगत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडथळे येत असून ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी कारखाना लगत असलेली स्मशानभूमी महामार्गाचे काम सुरू असल्याने गेल्या काही वर्षांपासून काढून टाकण्यात आलेली आहे.त्यातच या स्मशानभूमी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मरण पावलेली गुरे,ढोरे, याच ठिकाणी टाकलेली असल्यामुळे ग्रामस्थांना अंत्यविधी करत असताना अनेक अडचणी येत आहेत.
दि.(८) रोजी संध्याकाळी १० वा. इं.बगला येथील महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थ स्मशानभूमी जवळ आल्याने त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी अयोग्य जागा दिसल्याने अनेक ग्रामस्थांनी या बाबतीत संताप व्यक्त केला.या महामार्गाचे अनेक वर्षापासून काम सुरू आहे मात्र अंत्यविधी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केलेले नाही त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही ,विजेची सोय नाही, स्मशानभूमी देखील नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अंत्यविधी कसा करणार असा सवाल करीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला धारेवर धरत ग्रामस्थांनी फोनवरून ग्रामसेवकांना संपर्क साधल्या नंतर ग्रामपंचायती मार्फत त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने रात्री ९ वा.३० मि. ग्रामपचायत प्रशासनाने तत्परता दाखवली व त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली . मात्र वीज आणि पाणी नसल्याने याबाबत ग्रामपंचायत प्रशासन सुधरेल का? असा प्रश्न काही ग्रामस्थांनी उपस्थित केला.