लोकशासन- उपसंपादक:गणेश गुप्ते,इंदापूर
बारामती तालुक्यातील काटेवाडी, कन्हेरी या भागातील निरा डावा कालवा अस्तरीकरण करू नये अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन सहाय्यक अभियंता श्रेणी १ बारामती पाटबंधारे उपविभाग बारामती यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, बारामती उपतालुकाप्रमुख सतीश काटे यांनी दिले आहे.
नीरा डावा कालवा इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात आहे त्याचा मूळ उद्देश हा कालव्यालगतचे शेती व परिसरातील शेती ही पाजारातून व भुई पाटातुन शेतीला पाणी मिळावे हा होता.कालव्याची दुरुस्ती व डाग डुजी वेळच्या वेळी न झाल्याने कालवा फुटणे, कालव्याची क्षमता कमी होणे, अशा गोष्टी होत आहेत.
परंतु त्यासाठी अस्तरीकरण हा एकमेव पर्याय नाही जर प्रशासनाने अस्तरीकरण हाच पर्याय निवडला तर त्यामुळे परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे व शेतकरी देशोधडीला लागेल तरीही प्रशासनाने अस्तरीकरण करण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, बारामती उपतालुकाप्रमुख सतीश काटे आधी शिवसैनिकांनी दिला आहे.