जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी येथे शंभर कोटी वृक्ष लागवड व एक पेड माँ के नाम अभियान

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण

मदनवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी तालुका इंदापूर येथे आज शनिवार दिनांक पाच जुलै २०२५ रोजी शंभर कोटी वृक्ष लागवड व एक पेड माँ के नाम अभियान अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र शासनाने १०० कोटी वृक्ष लागवड व एक पेड माँ के नाम या महत्त्वकांक्षी अभियान अंतर्गत राज्यभर वृक्षारोपण मोहीम राबवण्याचे नियोजन केलेले आहे.

या नियोजनाचा एक भाग म्हणून मौजे मदनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी येथे आज पाच जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी शाळेतील सहशिक्षक प्रमोदकुमार कुदळे सर यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व व वृक्ष संवर्धन याबाबत माहिती दिली.

आपल्या आरोग्यामध्ये झाडांचे महत्त्व विषद केले.केंद्रप्रमुख दिलीप बनकर यांनी यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब व शिक्षणाधिकारी सन्माननीय संजय नाईकडे यांच्या पत्राचे वाचन केले.त्यानुसार सर्व शासकीय खाजगी शाळेमध्ये आज वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी मदनवाडी गावच्या आदर्श सरपंच अश्विनी बंडगर यांचे प्रतिनिधी म्हणून सिव्हिल इंजिनियर नानासाहेब बंडगर उपस्थित होते.त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते महादेव सकुंडे, व अनेक ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.पत्रकार निलेश गायकवाड व पत्रकार संजय शिंदे उपस्थित होते. वृक्ष संवर्धन संदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत ग्रामपंचायत तर्फे केली जाईल असे आश्वासन नानासाहेब बंडगर यांनी यावेळी दिले .यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते. उपशिक्षक राम वणवे यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button