
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
श्री वर्धमान विद्यालयातील १९७५-७६ शैक्षणिक वर्षाच्या १० वी S.S.C.बॅचचा सुवर्ण महोत्सवी मेळावा रविवार दिनांक २९ जून रोजी संपन्न झाला.तत्कालीन विद्यार्थी आणि शिक्षक असे १५० जणांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या मेळाव्याची सुरवात वालचंदनगर नगरीचे संस्थापक उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली.
मुख्य चौकातुन बॅडच्या तालावर नाचत, वाजत गाजत मिरवणूकीने सर्वजण श्री वर्धमान विद्यालयात आले.प्रास्ताविक विद्यार्थी समुह अध्यक्ष संजय चक्रदेव यांनी केले.तत्कालीन शिक्षक व्यंकटेश माळवदकर, विजय साळुंखे, प्रकाश कुलकर्णी, रावसाहेब खेडकर,सौ.कुलकर्णी , दादासाहेब सावंत यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.स्मरणीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विशेष कार्य करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना विशेष सुवर्ण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विद्यमान प्राचार्य हनुमंत कुंभार यांनी विद्यालयाचा प्रगतीचा आढावा घेतला.प्रा.माळवदकर यांनी मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आणि परीचय तसेच मेळाव्याला सहकार्य करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला.