
लोकशासन- प्रतिनिधी इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय तावशी ता इंदापूर विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी महादेव भगवान बागल यांची निवड झाली आहे.संस्थेचे माध्यमिक विद्यालय तावशी व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ही दोन विद्यालये असून महादेव बागल यांनी म्हसोबाचीवाडी विद्यालयात मागील ३२ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात उपशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले आहे.
उपशिक्षक पदावरून पदोन्नतीने त्यांची मुख्याध्यापक पदी निवड झाली आहे.सन १९९३ पासून माध्यमिक विद्यालये सुरू झाले असून आजतागायत दोन्ही विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार असल्याने शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने यशस्वीपणे सुरू ठेवली असल्याचे श्रेय अनुभवी शिक्षक वृंद यांचे असून त्यांचे योगदानामुळे शैक्षणिक प्रगती झाली असल्याचे संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी सांगितले.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते मुख्याध्यापक महादेव बागल यांना मुख्याध्यापक पदी नेमणूक झाल्याचा नियुक्ती आदेश देण्यात आला.
यावेळी माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडीचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग उपस्थित होते.मुख्याध्यापक पदी महादेव भगवान बागल यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव विरसिंह रणसिंग,विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,विश्वस्त कुलदिप हेगडे,विश्वस्त शंकरराव रणसिंग ,विश्वस्त सौ.विरबाला पाटील ,विश्वस्त सौ.राही रणसिंग यांनी अभिनंदन केले.