पुणे जिल्ह्यावर भाजपचे लक्ष ; हर्षवर्धन पाटलांची घरवापसी ?

Spread the love

लोकशासन : पुणे ग्रामीण

पुणे जिल्ह्यात भाजप चा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे.एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस,काॅंग्रेस आणि विशेष करून पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्या वरती भाजपचे विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या आमदारांची एकुण संख्या एकवीस ऐवढी असून या यापैकी नऊ जागेवर भारतीय जनता पक्ष,आठ जागेवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस,तर दोन्ही शिवसेनेच्या प्रत्येकी एक-एक व एका जागेवर अपक्ष असे बलाबल आहे.असे असले तरी २०२९ च्या निवडणूकीसाठी भाजप कडून शतप्रतिशत चा नारा देण्यात आला आहे.भाजपचे पुणे जिल्ह्यातील शहरी मतदार संघावर प्राबल्य असले तरी ग्रामीण मध्ये दौंड वगळता इतरत्र तितकेसे प्राबल्य पहाण्यात येत नाही.त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता आपला मोर्चा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदार संघाकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच शेखर वढणे यांची निवड झाली असून त्यांच्या निवडी नंतर पुणे जिल्ह्यातुन अनेक मातब्बरांचे भाजपमध्ये प्रवेश होत असुन नुकतेच इंदापूर तालुक्यातील विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहिलेले प्रविण माने यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.त्या पुर्वीच काही दिवस अगोदर भोर चे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता तर आता पुरंदर सासवडचे माजी आमदार संजय जगताप यांचा देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे.तर पुणे जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते पुढील काळात भाजप मध्ये प्रवेश करणार असुन काहींची घरवापसी होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षा कडून भाजपचा झेंडा फडकवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

हर्षवर्धन पाटलांची घरवापसी होणार ?

पुणे जिल्ह्यातुन काॅंग्रेस चे माजी आमदार संग्राम थोपटे तसेच संजय जगताप यांनी भाजप चे कमळ हाती घेतले असून इंदापूर तालुक्यातुन प्रविण माने यांच्या नंतर पुर्वाश्रमीचे काॅंग्रेस चे तर नंतर भाजप मधुन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची देखील थोड्याच दिवसांत भारतीय जनता पक्षा मध्ये घर वापसी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button