
लोकशासन : प्रतिनिधी-हेमंत थोरात,जंक्शन
जंक्शन : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलवाडी,मानकरवाडी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी चोऱ्या होऊन सोन्याचे दागिने चोरीस गेले होते.यामध्ये वालचंदनगर पोलिसांनी दोघांसह भवानीनगर मधील सराफावरती गुन्हा दाखल केला आहे.
मयुर उर्फ गांगल्या उर्फ संदेश भोसले रा. सोनगाव (ता. बारामती) , समीर उर्फ बोतल करवंद्या काळे, सराफ पंकज विलास शहाणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असुन याप्रकरणी सोनाली पप्पू सावंत यांनी फिर्याद दिली होती.याप्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये आज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची एक टिम तयार करून पोलीस स्टेशन हद्दीत व हद्दीच्या बाहेर सापळा रचून संदेश भोसले व समीर काळे यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला गुन्हाची कबुली वरील आरोपींनी दिली व हे सोने भवानीनगर येथील श्रीपाद ज्वेलर्स पंकज विलास शहाणे यांना विकल्याचे कबूल केले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.