शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली नाराजी.

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-किरण माने, शेळगाव

शेळगाव : (ता.०६) शेळगाव येथील पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र मध्ये होत असलेले अत्यंत कमी प्रमाणात आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक सुविधाचा अभावाबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी कामकाजाबद्दल ग्रामस्थानी तक्रारीचा पाढा वाचताच पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शेळगाव च्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

शुक्रवार (दि २) रोजी शेळगाव (ता.इंदापूर) येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा गाव भेट दौरा होता यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.यावेळी भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत असलेले कमी आरोग्य तपासण्या,औषध पुरवठा व अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल कडक शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करून कामकाजामध्ये कुचराई कराल तर कडक कारवाईला समोर जावे लागेल असा इशारा देखील गजानन पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिला.

यावेळी ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाबद्दल तक्रारी चा पाढा वाचला.प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांचे पदे नियुक्ती केले असून देखील आरोग्य अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात यामुळे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्तंभ (बायोमेट्रिक)मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना दिले.लवकरच पत्राची दखल घेऊ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

यावेळी प्रकल्प संचालिका शलिनी कडू,गटविकास अधिकारी सचिन खुडे,ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप,तालुका वैदकीय अधिकारी डॉ सुरेखा पोळ,सरपंच उर्मिला शिंगाडे,माजी पंचायत समिती सदस्य अँड.लक्ष्मणराव शिंगाडे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चवरे,मोहन खराडे,सागर वाघमोडे सह आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button