
लोकशासन : प्रतिनिधी-किरण माने,शेळगाव
शेळगाव : (ता.०७) कडबनवाडी (ता.इंदापुर) येथील ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित पाहून व त्यांचा ग्रामपंचायतीने सन्मान घेताना पाहून खूप आनंद झाला.तसेच कडबनवाडी येथील गावाची प्रगती पाहता हे गाव अभियानामध्ये भरारी घेईल अशी आशा पद्मश्री चैतराम पवार यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये कडबनवाडी गावाने सहभाग घेतला असून गावातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवार (दिनांक १) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या हस्ते वैकुंठ स्मशानभूमी येथे वृक्षारोपण देखील करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये सुमारे पन्नास ज्येष्ठ नागरिकांना आंब्याचे रोपे व मानाचा फेटा बांधून ग्रामपंचायतच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पवार यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी दादासाहेब गावडे यांच्या चांगल्या कामकाजाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री चैतराम पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच दादासो जाधव, पर्यावरण प्रेम भजनदास पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते माऊली चवरे, ग्रामपंचायत अधिकारी दादासाहेब गावडे,शुभम शिंगाडे,माजी उपसरपंच आप्पासो गावडे,बचत गटाच्या शितल जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक किरण माने यांनी केले तर आभार माऊली चवरे यांनी मानले.