
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापुर ग्रामीण
इंदापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नुकतीच नाळे यांची नियुक्ती झाली असून त्यांचे इंदापूर मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शितल साबळे यांनी नाळे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.तर शहर अध्यक्षा माधुरी भराटे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन कडून महिलांना न्याय मिळेल अशा प्रकारे आपले काम राहावे म्हणून शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप च्या पुर्व मंडल अध्यक्षा प्रमिला राखुंडे ,शहर अध्यक्षा माधुरी भराटे,शहर सरचिटणीस रुपाली रणदिवे,शहर उपाध्यक्षा सलमा खान, सरचिटणीस स्वाती अवचर आदी उपस्थित होते.